kimaya narayan
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेशोत्सव थाटात पार पडला. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत मुख्यमंत्र्याच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं दर्शन घेतलं.
दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी बाप्पाचं दर्शन घेत आरती केली.
झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनीही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही हजेरी लावत बाप्पांची आरती केली.
सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनीही गणेशोत्सवाला हजेरी लावली.
अमेय वाघनेही गणेशोत्सवाला हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं.
हेमांगी कवीनेही बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली.
अभिनेत्री शिवानी रांगोळेनेही गणपती बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली.
स्वप्नील जोशीनेही बाप्पाचं दर्शन घेत त्याचे आशीर्वाद घेतले.
अभिनेता संतोष जुवेकरने हजेरी लावत बाप्पाची मनोभावे आरती केली.
अभिनेत्री रुचिरा जाधवनेही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
अभिनेता सुशांत शेलारने सहकुटूंब बाप्पाचं दर्शन घेतलं.