सकाळ डिजिटल टीम
सोशल मीडियावर एका मराठी जोडीच्या फोटोजनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याच्या फोटोही तुलना थेट बॉलिवूडशी होतेय.
ही जोडी आहे अभिनेत्री मिताली मयेकर आणि तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर.
सिद्धार्थ आणि मिताली यंदा इटलीला इरायला गेले असून त्यांच्या भन्नाट लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मितालीने ब्लु रंगाचा स्कर्ट, टॉप आणि त्यावर लॉँग व्हाईट शर्ट असा लूक केला होता.
तर सिद्धार्थने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट हा कॉड सेट घातला होता. तर मितालीच्या प्रिंटेड लॉँग ड्रेसनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिद्धार्थने या फोटोला 'लिंबूपाणी' असं कॅप्शन दिलंय.
सिद्धार्थचा हा भन्नाट लूकही अनेकांना पसंत पडलाय.
सोशल मीडियावर त्याच्या या लूकचं कौतुक होतंय.