Sudesh
भारत सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने एक इशारा जारी केला आहे.
अँड्रॉईडच्या कित्येक व्हर्जन्समध्ये सुरक्षेसंबंधी त्रुटी आढळून आल्याचं CERT-In ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
या त्रुटींमुळे हॅकर्स मोबाईल डिव्हाईसमध्ये आरामात प्रवेश करू शकतात असा इशारा सरकारने दिला आहे.
अँड्रॉईडच्या 11, 12, 12L, 13, 14 आणि इतर काही व्हर्जन्सवर या त्रुटी आढळून आल्या आहेत.
यासोबतच गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये देखील सुरक्षा त्रुटी आढळल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
गुगलनेही या त्रुटी मान्य केल्या असून, त्या केवळ जुन्या व्हर्जनवर असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.
आपलं ब्राऊजर अधिक सुरक्षित करण्यासाठी ते त्वरीत अपडेट करून घ्यावं असं आवाहन सरकार आणि गुगलने केलं आहे.