सकाळ डिजिटल टीम
कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या चंदगड तालुक्यात विविध सण उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
होळीला गावागावांतून काढली जाणारी सोंग ही नागरिकांसाठी पर्वणी ठरतात.
पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील प्रसंग व व्यक्तिरेखेवर आधारित सोंगं काढली जातात.
यामुळं ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलाकारीला उधाण येतं.
डोक्यावर घागरीची उतरंड घेतलेल्या लमाण तरुणीच्या वेशातील तरुण.
चिमुकल्यांनी काढलेले सोंग ग्रामस्थांचे आकर्षण ठरले. (फोटो : सुनील कोंडुसकर)