चांद्रयान-३ मोहिमेमागे आहेत हे 'रॉकेटबॉईज'; पाहा इस्रोची टीम

Sudesh

चांद्रयान-३

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम, 'चांद्रयान-३'चं लाँचिंग आज पार पडलं. श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन चांद्रयानाने अंतराळात झेप घेतली.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

चंद्र मोहीम

भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न इस्रो करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरेल. यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी मोठी मेहनत घेतली आहे.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

एस. सोमनाथ

इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ हे चांद्रयान-३ मोहिमेचे प्रमुख आहेत. यासोबतच आदित्य-एल१ आणि गगनयान मोहीम देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

पी. वीरामुथुवेल

चांद्रयान-३ मोहिमेचे प्रोजेक्ट डिरेक्टर हे पी. वीरामुथुवेल आहेत. तामिळनाडूचे हे वैज्ञानिक गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रोमध्ये कार्यरत आहेत.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

एस. उन्नीकृष्णन नायर

व्हीएससीसी केंद्राचे प्रमुख आणि एलव्हीएम-३ रॉकेटचे निर्माते नायर हे या मोहिमेतील महत्त्वाचे व्यक्ती आहेत.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

ए. राजराजन

श्रीहरीकोटामध्ये असणाऱ्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राचे हे डिरेक्टर आहेत. चांद्रयान-३ लाँच होण्यासाठीचा ग्रीन-सिग्नल हेच देतील.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

एम. शंकरन

सॅटेलाईट डिझाईन आणि डेव्हलपमेंट करणारी संस्था URSC चे डिरेक्टर हे एम. शंकरन आहेत. चांद्रयान-३ च्या सॅटेलाईट टीमचे ते प्रमुख आहेत.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

चयन दत्ता

चयन दत्ता हे चांद्रयान-३ चे डेप्युटी प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत. ऑन बोर्ड कमांड टेलीमीटरी, डेटा हँडलिंग आणि स्टोरेज सिस्टीमचे ते प्रमुख असतील.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal

रितू करिधल

रितू करिधल या चांद्रयान-३ च्या मिशन डायरेक्टर आहेत. इस्रोचा यंग सायन्टिस्ट पुरस्कार देखील रितू यांना मिळाला आहे. या टीममधील या एकमेव प्रमुख महिला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrayaan-3 ISRO Team | eSakal