चांद्रयान-३ : काय आहे मिशन? कधी होणार लाँच? जाणून घ्या

Sudesh

चांद्रयान-३

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोची ही तिसरी चंद्रमोहीम असणार आहे. यापूर्वी २००८ साली पहिली आणि २०१९ साली दुसरी चांद्रयान मोहीम राबवण्यात आली होती.

Chandrayaan-3 | eSakal

चांद्रयान मोहीम

चंद्राच्या पृष्ठभागाचा दूरून अभ्यास करून, त्यावर पाण्याचा शोध घेण्यासाठी पहिली चांद्रयान मोहीम राबवण्यात आली होती. यानंतर, दुसऱ्या मोहिमेत चांद्रयान हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते.

Chandrayaan-3 | eSakal

तांत्रिक बिघाड

काही तांत्रिक बिघाडामुळे दुसऱ्या मोहिमेमधील चांद्रयान चंद्रावर सुरक्षित लँडिंग करू शकले नाही. यामुळे आता पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

Chandrayaan-3 | eSakal

लाँच कधी?

१४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटामध्ये असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल.

Chandrayaan-3 | eSakal

रॉकेट

या मोहिमेसाठी इस्रोचे एलव्हीएम-३ हे रॉकेट वापरण्यात येणार आहे. १४ तारखेला दुपारी २.३५ वाजचा हे रॉकेट अंतराळात लाँच केले जाईल.

Chandrayaan-3 | eSakal

रंगीत तालीम

इस्रोने बुधवारी या मोहिमेची रंगीत तालीम पार पाडली. यामध्ये सर्व उपकरणे आणि सेंटर्सची चाचणी करुन, सर्व योग्य असल्याची खात्री केली गेली.

Chandrayaan-3 | eSakal

बजेट

चांद्रयान-३ या मोहिमेसाठीचं अंतिम बजेट ६१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. हे बजेट चांद्रयान-२ या मोहिमेच्या तुलनेत (९७८ कोटी रुपये) कमी असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

Chandrayaan-3 | eSakal

प्रोपल्शन मॉड्यूल

यावेळी चांद्रयान-२ प्रमाणे ऑर्बिटरचा वापर न करता, त्याऐवजी प्रॉपल्शन मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. ऑर्बिटरच्या तुलनेत याची किंमत कमी असल्यामुळे एकूण बजेट कमी झालं आहे.

Chandrayaan-3 | eSakal

कधी पोहोचणार?

इस्रोने लाँच केल्यानंतर पृथ्वीवरून चंद्रापर्यंत पोहोचणं आणि तिथे सुरक्षित लँड होणं या सर्व प्रक्रियेला सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrayaan-3 | eSakal