मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर या गोष्टींवरही नियंत्रण ठेवा

Aishwarya Musale

मधुमेह

आजकाल मधुमेहाचं प्रमाण फार वाढत चाललं आहे. सामान्यत: मधुमेहाच्या रूग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फक्त गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

तर, यासाठी तुमच्या सवयी देखील कारणीभूत आहेत. त्यामुळे तुमच्या सवयींवर लक्ष ठेवणं तसेच त्या नियंत्रित ठेवणं गरजेचे आहे. या अशा कोणत्या सवयी आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

दररोज व्यायाम करा

मधुमेहापासून दूर राहण्यासाठी, दररोज किमान 30-40 मिनिटं शारीरिक हालचाली करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारखे व्यायाम करा. योग करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.

अशी अनेक आसने आहेत, जी हार्मोन्स संतुलित ठेवतात, पचनसंस्था निरोगी ठेवतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. तसेच ध्यानावर देखील लक्ष केंद्रित करा. यामुळे तणाव दूर होतो

खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा

जर तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल. यासाठी निरोगी आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजून घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा कमी प्रमाणात खा. आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा

मीठ आणि साखरेवर नियंत्रण ठेवा

मिठाईचे सेवन कमीत कमी प्रमाणात करा. रात्रीच्या वेळी आहारात मीठ आणि साखरेचा वापर पूर्णपणे टाळा. त्याऐवजी गुळाचे सेवन करा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

धूम्रपान आणि मद्यपानाच्या सेवनामुळे रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासूनही दूर राहा. 

वजन नियंत्रणात ठेवा

प्री-डायबेटिस असलेल्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यास तो मधुमेहापासून बऱ्याच अंशी दूर राहू शकतो. हाच नियम मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना लागू होतो. बॉडी मास इंडेक्स (BMI) 18 ते 23 च्या दरम्यान ठेवा. तुमच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा.

त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा