सकाळ डिजिटल टीम
सीताफळ खाण्यास चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. या फळाची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. चला जाणून घेऊया ही पाने चघळण्याचे फायदे..
सीताफळामध्ये भरपूर पोषक असतात. कॅलरी, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन यांसारखे पोषक घटक आढळतात
सीताफळच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात.
सीताफळची पाने चघळल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.
सीताफळच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. याचे सेवन केल्यास पचनसंस्थेला फायदा होतो.
सीताफळच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेसाठी फायदेशीर असतात. याच्या मदतीने वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सीताफळची पाने चावू शकता. यातून निघणारा रस शरीरासाठी फायदेशीर असतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.