सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल आपण सर्वांना माहिती आहेच, पण तुम्हाला माहिती आहे का की, संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढलं होतं.
७ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज व्हीसेरेई (व्हॉईसरॉय) फ्रान्सिको दि ताव्होरा याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला होता.
यानंतर संभाजी महाराज तीन हजार सैन्यासह राजापूरहून गोव्याच्या दिशेने निघाले. २४ नोव्हेंबरला संभाजी महाराजांचे सैन्य पोर्तुगीज्यांच्या ताब्यातील सांत एस्तेव्हावं म्हणजेच जुवे बेटावर शिरलं.
तर पुढे १२ डिसेंबर रोजी मराठ्यांनी साष्टी व बारदेशाच्या मुलूखावर हल्ला करून सगळीकडे लूट व जाळपोळ केली. तसंच रायतर, नडगांव, आग्वाद, व रेईसमागुस या चार किल्ल्यांखेरीज इतर किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले.
त्यानंतर गोवा बेट घेण्यासाठी मराठ्यांचे प्रयत्न चालू होते; लढाई पुढे चालू राहिली, तर हे बेट संभाजी राजे ताब्यात घेणार हे निश्चित होते.
दरम्यान संभाजी महाराजांच्या धास्तीने पोर्तुगीजांनी जुन्या गोव्यातील बॉम जीजस या चर्चमध्ये ठेवलेल्या सेन्ट फ्रान्सिस झेवियर याचे शवपेटीत बंद असलेले थडगे पुन्हा उघडायला लावले.
थडगे उघडल्यावर त्याने पोर्तुगीजांचा राजदंड त्या शवाच्या हातात ठेवला व त्याची संकट निवारणार्थ करुणा भाकली.
यावेळी एक कागदही तेथे ठेवण्यात आला ज्यावर लिहले होते की पोर्तुगालच्या राजाच्यावतीने त्याने हे राज्य संत फ्रान्सिस झेवीयरला अर्पण केले असून काहीतरी चमत्कार करून आम्हाला या संकटापासून वाचवावे.
ही सगळी प्रार्थना ऐकूनच की काय याचवेळी सुमारे १ लाख मुघल सैन्य स्वराज्यावर चालून येत असल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली अन् त्यांनी गोव्याचा वेढा उठवला.
त्यावेळी मुघलांनी हल्ला केला नसता तर यावेळी गोवा मराठ्यांच्या हातात पडल्यावाचून राहिला नसता.
स्पाय थ्रिलर चित्रपट करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूने साधला निशाणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.