Sandip Kapde
शिवाजी महाराजांविषयी नेहमीच एक वेगळे आकर्षण असते.
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा सतत मनात असते.
शिवरायांचे बालपण कसे होते, याबद्दल विस्तृत वर्णन शिवभारतात दिलेले आहे.
ही माहिती शेवटपर्यंत वाचा; कारण शिवरायांचे बालपण तुमच्या डोळ्यांसमोर येईल.
कवींद्र परमानंद यांनी शिवाजी महाराजांचे बालपण पाहिलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचे चरित्र लिहिले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणातील गमतीजमती वाचताना त्या प्रसंगांची जिवंतता अनुभवता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्याचा भास होतो.
शिवाजी महाराजांचे बालपण ते अफजल खान वधापर्यंत वर्णन शिवभारतात केले आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी त्यांचा मोठा काळ खेड शिवापूरमध्ये गेला.
शिवाजी महाराज अतिशय मोहक आणि हसतमुख होते. धुळीत खेळताना ते अंगणात रांगत असत.
लहानपणी, शिवाजी महाराज मातीच्या हत्ती आणि घोड्यांशी खेळत असत. मोर, कोकिळा, पोपट यांचे आवाज काढून ते खेळत असत.
तसेच वाघासारखा आवाज काढून भीती दाखवत असत.
चेंडू, भोवरा यांसारखे खेळ खेळताना शिवाजी महाराज यांचे वर्णन परमानंद यांनी शिवभारतात केले आहे.
जिजाऊ माऊली साधू संतांच्या गोष्टी सांगत, त्यामुळे महाराजांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला.esakal
जिजाऊ माऊली साधू संतांच्या गोष्टी सांगत, त्यामुळे महाराजांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला.
मावळ्यांच्या मुलांना शिवाजी महाराज फार आवडत.
पुढे शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांना दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, कुस्ती आणि घोड्यावर बसण्यासह अनेक गोष्टी शिकवल्या.
शहाजीराजे यांनी आपल्या तालमीत शिवाजी महाराजांना १२ व्या वर्षापर्यंत तयार केले.