हिंदवी स्वराज्याचा उल्लेख शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कधी केला?

Pranali Kodre

छत्रपती शिवाजी महाराज

देशाला ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श शासनकर्ता आणि जाणता राजा म्हणून छत्रपती शिवरायांना ओळखले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Hindavi Swarajya Reference | Sakal

हिंदवी स्वराज्य

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापकही म्हटले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

आदिलशाही आणि मुघल साम्राज्याला धक्के

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १९७४ मध्ये झाले. पण त्यापूर्वीपासूनच शिवाजी महाराज मराठ्यांचे नेतृत्व करत होते. त्यांनी त्यांच्या मावळ्यांच्या सहाय्याने अनेक लढाया जिंकत आदिलशाही आणि मुघल साम्राज्याला धक्के दिले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न

आपले एक हिंदवी स्वराज्य असावं असं त्यांचं स्वप्न होतं असं म्हटलं जातं. त्यासाठी त्यांनी अगदी लहान वयापासूनच प्रयत्न केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

हिंदवी स्वराज्याचा उल्लेख

दरम्यान, १७ एप्रिल १६४५ रोजी शिवरायांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यांना एक पत्र लिहिलेलं होतं, जे उपलब्ध आहे. या पत्रात 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे' असा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर या पत्रात हिंदवी स्वराज्य असाही उल्लेख आढळतो.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

संशय

या पत्राशिवाय त्यांच्या कोणत्याही पत्रात हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. त्यामुळे काही इतिहासकारांना हे पत्र खरं आहे की खोटं यावर संशय आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

स्वतंत्र राज्य

पण असे असले तरी हे निश्चित आहे की स्वतंत्र राज्य असावे अशी कल्पना मात्र १६४५ पासूनच त्याच्या मनात घोळत होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

शिवरायांचे पत्र

त्यांचे २८ जानेवारी १९४६ रोजीचे न्यायनिवाडाविषयक पत्रही उपलब्ध आहे. या पत्राच्या सुरुवातीला शिवमुद्रा आढळते. तसेच पत्राच्या शेवटी 'मर्यादेयं विराजते' ही दुसरी मुद्रा दिसून येते.

Chhatrapati Shivaji Maharaj Hindavi Swarajya Reference | Sakal

स्वराज्याच्या कार्याचा प्रारंभ

या मुद्रा त्यांच्या स्वराज्याच्या कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष देतात.

Chhatrapati Shivaji Maharaj Hindavi Swarajya Reference | Sakal

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेकावेळी सिंहासन कसं होतं? वाचा वर्णन

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal
येथे क्लिक करा