छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेकावेळी सिंहासन कसं होतं? वाचा वर्णन

Pranali Kodre

ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर ६ जून १६७४ रोजी पार पडला.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

हेन्री ऑक्झिन्डेनची हजेरी

हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी दूरदूरहून लोक आले होते. यामध्ये इंग्रज प्रतिनिधी म्हणून हेन्री ऑक्झिन्डेन देखील उपस्थित होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

हेन्रीने लिहून ठेवली आठवण

हेन्रीने आपल्या रोजनिशीमध्ये शिवराज्यभिषेकाची घटना लिहून ठेवली आहे. त्याने रायगड किल्ल्याबद्दलही लिहिले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

भव्य सिंहासन

त्याने जी नोंद करून ठेवली आहे, त्यानुसार राज्याभिषेकाच्या दिवशी राजे भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. सिंहासनाखालील एका ओट्यावर संभाजी राजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राम्हण बसलेले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

सिंहासनाचं वर्णन

छत्रपती शिवाजी महाराज ज्या सिंहासनावर आरूढ झाले होते, त्याबद्दल हेन्रीने लिहून ठेवलंय की सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सुवर्णाच्या भाल्याच्या टोकावर अनेक राजसत्तेची आणि अधिकारदर्शक चिन्ह आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

राजसत्तेची आणि अधिकारदर्शक चिन्ह

उजव्या हाताला सोन्याची दोन मोठमोठ्या दाताच्या मत्स्यांची शिरे होती. डाव्या हाताला अश्वपुच्छे होती. एका मूल्यवान भाल्याच्या टोकाला सोन्याची तराजूची समपातळीवर असलेली पारडी होती, जी न्यायचिन्ह होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

शुभचिन्ह

दरम्यान आत्तापर्यंत अनेक इतिहासकारांनी या शुभचिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला असून साधरणत: असं मानलं जातं की समुद्रवर्चस्व दाखवण्यासाठी मत्स्यचिन्ह वापरलं जातं, तर नेहमी सज्ज असण्यासाठी अश्वपुच्छ हे प्रतिक वापरलं जातं. तराजू न्यायाचं प्रतिक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवरायांची तुला केली तेव्हा त्यांचे वजन किती भरले होते?

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा