छत्रपती शिवरायांनी तिरूपती मंदिरात चालवलं होतं अन्नछत्र; मंजूर केली होती इतकी रक्कम

रोहित कणसे

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ केली जात असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू आहे.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

पण तुम्हाला माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराज देखील तिरूपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते, इतकेच नाही तर त्यांनी तेथे अन्नछत्र देखील चालवले होते.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

नोव्हेंबर 1676 मध्ये संपूर्ण दक्षिण भारताला मराठ्यांच्या झेंड्याखाली आणण्याचं स्वप्न उराशी घेऊन शिवाजी महाराज आपली विजयी सेना घेऊन  हैदराबाद, गोवळकोंड्याच्या दिशेने निघाले होते.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

या मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांचा स्वागत केले. इतकेच नाही तर कुतुबशहाने महाराजांचा मांडलिकत्व स्वीकारलं. त्यानंतर महाराज श्रीशैलमला पोहचले.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

श्रीशैलमला शिवाजी महाराजांचा मुक्काम नऊ दिवसांसाठी होता, येथे मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन महाराज तेथून आलमपूरला पोहोचले.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

करनुल, नांदियाळ,कडप्पा मार्गे 4 मे 1677 रोजी महाराज तिरुपती येथे व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आले.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

या मोहिमेदरम्यान बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिरुपती देवस्थानसाठी महाराजांनी पुरुषोत्तम भट, सोमय्या भट बुर्डी यांना एक सनद दिली. ती सनद उपलब्ध आहे.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

या सनदेनुसार एक होनाचे ब्राह्मणास अन्नदान, श्री पूजेसाठी वार्षिक तीस होन, कर्पूर दिपा साठी वार्षिक सहा होन, श्रीनिवास मूर्तीसाठी शिराबधी अभिषेकार्थ बारा होन, नंदादीपा साठी बारा होन देण्याचा निर्णय महाराजांनी घेतला.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

यासोबतच पूजेनिमित्त श्री पुरुषोत्तम बुर्डीना वार्षिक तीस होन वर्षासन, रोजच्या अन्नछत्रासाठीतीनशे साठ होन, असे चारशे वीस होन असे प्रति वर्षी श्रीच्या मूर्तीसाठी देण्याचे महाराजांनी ठरवले होते.

tirupati balaji temple annachhatra by Shivaji Maharaj

विशेष म्हणजे पुढच्या एक वर्षासाठी श्रींची पूजा अर्चा, त्याचबरोबर अन्नछत्रासाठी लागणारे चारशे वीस होन महाराजांनी तत्काळ बुर्डीच्या स्वाधीन केले.

Chhatrapati Shivaji Maharaj

तिरुपतीहून निघाल्यानंतर शिवाजी महाराज कालहस्ती मार्गे मंदिराच्या जवळ पाच मैलावरील पेंदापोलम येथे 9 मे 1677 रोजी येऊन पोहोचले. श्रीशैलम्म, तिरुपती, कालहस्ती ही सर्व देवस्थाने तेव्हा कुतुबशाह याच्या अखत्यारित येत होती.

Chhatrapati Shivaji Maharaj

महाराजांनी कुतुबशाहकडून या देवस्थानांना कोणत्याही प्रकारचा उपसर्ग होणार नाही, याची हमी देखील घेतली होती. तसंच महाराजांनी तिरुपती देवस्थान यांना दिलेल्या सनदेनुसार संपूर्ण वर्षासन नेहमी चालू ठेवली गेली.

Chhatrapati Shivaji Maharaj wives names

शिवछत्रपतींच्या 8 महाराण्यांची नावे काय होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What did Chhatrapati Shivaji Maharaj look like Have you seen the real photos | esakal
येथे क्लिक करा