शिवरायांची तुला केली तेव्हा त्यांचे वजन किती भरले होते?

Pranali Kodre

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे उलटून गेले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

ऐतिहासिक राज्याभिषेक

रायगड किल्ल्यावर ६ जून १६७४ रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

विधी

दरम्यान राज्याभिषेक विधीला २९ मे पासूनच सुरुवात झाली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

तुलापुरुषदान

राज्याभिषेक होण्यापूर्वी शिवरायांचे व्रतबंध होणे आवश्यक असल्याने त्यांची २९ मे रोजी मुंज करण्यात आली होती. त्यावेळी प्रायश्चित विधी म्हणून तुलापुरुषदान करण्यात आले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या प्र.न. देशपांडे लिखित छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवरायांचे वजन

पुस्तकानुसार डच कागदपत्रांमध्ये शिवरायांच्या तुलादानाबाबत माहिती आढळते. डचांच्या कागदपत्रांनुसार शिवरायांचे वजन १७,००० पगोडे म्हणजेच सुमारे १६० पौंड भरले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवरायांची तुला

शिवाजी महाराजांची पहिली सुवर्णतुला करण्यात आली होती. त्यानंतर चांदी आणि तांब्याचीही तुला करण्यात आली. त्यानंतक विविध फळे आणि साखर इत्यादी गोष्टींचीही तुला करण्यात आली.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

११ हजार लोक

या सोहळ्यासाठीही देशाच्या विविध भागांमधून साधारण ११ हजार लोक रायगडावर उपस्थित होते, अशी नोंद डच कागदपत्रांमध्ये आढळते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जेव्हा मराठ्यांनी ताजमहालला घोड्यांचा तबेला बनवलेला

Maratha Cavalry hide horses in the Taj Mahal | Sakal
येथे क्लिक करा