रोहित कणसे
रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याबद्दल सर्वांना बहुतेक गोष्टी माहिती असतात, पण अद्यापही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांसाठी नवीन असू शकतात.
जसे की छत्रपती शिवरायांच्या आठ पत्नींची नावे काय होती आणि त्यांचा विवाह कधी झाला होता? आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
डॉक्टर वि. गो. खोबरेकर यांच्या शिवकाल (१६३० ते १७०७) या पुस्तकात शिवछत्रपतींच्या आठ महाराण्यांची नावे आणि लग्नाची तारीख याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांचा पहिला विवाह सईबाई (निंबाळकर) यांच्याशी झाला, या लग्नाची तरीख १७-४-१६४० होती.
तर सगुणाबाई (शिर्के) यांच्यासोबत झालेल्या शिवरायांच्या लग्नाची तारीख ही एप्रिल स. १६४१ असल्याचे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
सोयराबाई (मोहिते) यांच्यासोबत छत्रपती शिवरायांचे लग्न स. १६५० पूर्वी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि पुतळाबाई (मोहिते) यांच्या लग्नाचा सोहळा हा स. १६५३ साली झाला, ज्या पुढे सती गेल्या.
लक्ष्मीबाई (विचारे) यांचे शिवरायांशी लग्न स. १६५६ पूर्वी झाल्याचे या पुस्तकात देण्यात आले आहे.
शिवराय आणि सकवारबाई (गायकवाड) यांचे लग्न जानेवारी १६५७ साली झाले असे खोबरेकर त्यांच्या पुस्तकात सांगतात.
तर काशीबाई (जाधव) यांचे शिवरायांशी लग्न ८-४-१६५७ या तारखेला झाल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
गुणवंताबाई (इंगळे) आणि शिवराय यांचे लग्न हे १५-४-१६५७ या तारखेला झाले होते अशी माहिती शिवकाल या पुस्तकात देण्यात आली आहे.
राजकारणात येण्याविषयी काय म्हणाले नाना पाटेकर?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.