सकाळ डिजिटल टीम
मुले डबा खात नाहीत, ही तक्रार खरोखरच नेहमीची आहे. जवळजवळ सगळ्या आयासाठी वेगवेगळे उपाय असतात. डब्यातले पदार्थ मुलांना चटकन सहजपणे उचलता येतील असे पदार्थ हवेत. मुलांची आवड आणि पोषणमूल्ये सांभाळून मुलांचा डबा अधिकाधिक इंटरेस्टिंग करता येईल. तर चला, पाहूया काही उपाय
हिवाळात मुलांना गरम आणि उबदार पदार्थाची आवड असते. त्यामुळे त्यांना डब्याला सूप, गरम गरम पराठा, पोळी सोबत वेगवेगळे भाजी द्या. जाणे उबदार ठेवेल आणि ते ताजेतवाने होऊन डबा खातील.
हिवाळ्यात थंडीमुळे भूक जास्त लागते. त्यामुळे मुलांना पौष्टिक असे घरी बनवलेले चॉकलेट-नट्स, शेंगदाण्याचे लाडू, गुळाचे हळदीचे लाडू असे डब्यात मुलांना देऊ शकता. जे करून मुलं लवकर डबा खातील.
डब्यात रंगीबेरंगी, विविध प्रकारचे पदार्थ द्या. उदाहरणार्थ, फळे, हलके सॅलड्स, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांमध्ये आवडीनुसार व्हेजिटेबलचा वापर करा. वेगवेगळ्या फ्लेवर्ससह सूप किंवा सॅंडविचेस देखील देऊ शकता.
हिवाळ्यात फळे आणि भाज्यांचा सेवन मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते. सफरचंद, अंजीर, संत्रा, चिकू, गाजर, यासारख्या फळांचा मुलांच्या डब्यात ठेवा. जेणे करून आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हिवाळ्यात मुलांना हलके आणि चविष्ट स्नॅक्स जसे बटर टोस्ट, फ्रूट बार, घरच्या घरी बनवलेली मिक्स चिवडा, बेक केलेले कॅक्स किंवा गोड खारी देऊ शकता.
येथे क्लिक करा...