Anuradha Vipat
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर
चिन्मय इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसतो
काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकरने एक मुलाखत दिली होती
यावेळी चिन्मयने सोशल मीडियावर अधिक सक्रिय न राहण्यामागचं कारण सांगितलं आहे.
चिन्मय म्हणाला, “मी सोशल मीडियावर नाही म्हणून मी काम करतोय. आयुष्यात मला ट्विटर (एक्स) जमलं नाही. कारण मला ती खूप मोठी गटार गंगा वाटते. त्यामुळे मी त्या वाटेला जात नाही.
मी कुठं जातोय? काय करतोय? कुठे जेवलो? कुठे गेलो? काय खाल्लं? माझ्या कुटुंबातील सदस्य काय करतात? हे जगाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या पण आयुष्यात काम आहे. त्यामुळे सोशल मी मीडियापासून दूर असतो असंही यावेळी चिन्मय म्हणाला