चिन्मय मांडलेकर सांगितला नाटकादरम्यान घडलेला 'तो' किस्सा

Anuradha Vipat

चिन्मय मांडलेकर

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल नाव कमावलं आहे. 

Chinmoy Mandlekar

पुरस्कार सोहळ्याला हजेरी

चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ नाटकाच्या निमित्ताने चिन्मयने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

Chinmoy Mandlekar

नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा

या सोहळ्यात चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.

Chinmoy Mandlekar

सहकलाकार

चिन्मय म्हणाला, माझी जी एक आठवण आहे ती माझ्या एका सहकलाकाराबद्दलची आठवण आहे. तो सहकलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.

ब्लॅकआऊट

चिन्मय पुढे म्हणाला, “आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. प्रयोगामध्ये सिद्धार्थला ब्लॅकआऊटमध्ये नेमक कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरून खाली पडला.

प्रयोग

बोलताना चिन्मय पुढे म्हणाला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ती जखम तशीच घेऊन त्याने पुढचा सगळा प्रयोग पूर्ण केला.

‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

येथे क्लिक करा