सकाळ डिजिटल टीम
सणासुदीत किंवा रोजच्या वेळेत आपण परफेक्ट तयार होतो, पण टिकली कोणती लावावी, हे नेमकं कळत नाही. टिकलीमुळे चेहरा आणखी चांगला खुलून दिसू लागतो. किंवा टिकलीची निवड चुकली तर त्याच्या उलट ही होऊ शकते. म्हणूनच तर आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार योग्य टिकली ची निवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी या खास टिप्स. तुमचा चेहऱ्याचा आकारनुसार नेमकी कोणती टिकली लावायची बघा.
चेहऱ्याचा आकार गोलाकार असेल तर, उभी, त्रिकोणी टिकल्या अधिक छान दिसतील आणि त्यामुळे चेहऱ्याचा आकार अधिक उठून दिसते.
चेहऱ्याचा आकार जर ओव्हल शेपला चंद्रकोर टिकली, गोलाकार टिकल्यांची सौंदर्य अधिक खुलून दिसते.
चेहऱ्याचा आकार त्रिकोणी असेल तर गोलाकार आणि मोठी टिकली लावा.
जर चौकोनी असेल तर अंडाकृती, चंद्रकोर टिकल्या जास्त शोभून दिसतील.
येथे क्लिक करा...