Monika Lonkar –Kumbhar
सध्या सर्वत्र ख्रिसमसची धामधूम पहायला मिळत आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक पालक आपल्या लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करतात आणि मग त्याचे फोटोशूट करतात.
लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.
जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सांताक्लॉज ड्रेसची खरेद करणार असाल तर तेव्हा मुलाला तो ड्रेस व्यवस्थित फिटिंगला बसेल याची खात्री करूनच खरेदी करा. त्यासाठी आधी मुलाच्या ड्रेसच्या साईजचा अंदाज घ्या, मगच ड्रेस खरेद करा.
सगळीकडे आता कडाक्याची थंडी सुरू आहे. त्यामुळे, जर तुम्ही ख्रिसमसला मुलाला सांताक्लॉजचा ड्रेस घालणार असाल तर मुलाला किंवा मुलीला ड्रेसच्या आतून ऊबदार स्वेटर घालायला विसरू नका. जेणेकरून मुलाला थंडी वाजणार नाही.
सांताक्लॉजची खास ओळख ही त्याच्या पांढऱ्या रंगाच्या दाढीपासून होते. त्यामुळे, मुलाला किंवा मुलीला सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पांढरी दाढी लावायला विसरू नका. यामुळे, तुमची मुले क्यूट दिसतील
सांताक्लॉजच्या रूपात मुलाला किंवा मुलीला रेडी केल्यानंतर लाल किंवा पांढऱ्या रंगाची सांताक्लॉज टोपी घालायला विसरू नका. यामध्ये मुले फारच गोड दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.