साक्षी राऊत
भारतीय किचनमध्ये लवंगचा वापर चहा बनवण्यापासून चते दाताच्या दुखण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी होतो. जेवणाची चव वाढवण्यासाठीसुद्धा याचा वापर केला जातो.
लवंगाच्या पाण्यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सूजन, रेडनेस आणि सेंसिटिव्ह स्किन रिलेटेड इश्यूजपासून तुम्हाला आराम मिळतो.
लवंगामध्ये असे काही मिनरल्स असे जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्सच्या उत्पादनाला उत्तेजित करतात. उत्तम पचनशक्ती आणि पोषक तत्व वाढवण्यास ते फायदेशीर ठरतात. लवंगाचे पाणी पोटाच्या समस्या दूर करतात.
लवंगमध्ये यूजेनॉल असते, जे आपल्या अँटीबॅक्टेरियल आणि एनाल्जेसिक गुणांसाठी ओळखल्या जाते. लवंगाचे पाणी पिल्याने ओरल इन्फेक्शनपासून लढण्यास, दातांचे दुखणे कमी करण्यास मदत होते. शिवाय तोंडातून येणारा दुर्गंधही कमी होतो.
अँटीऑक्सिडंटयुक्त लवंगाचे पाणी इम्युनिटी वाढवते. त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढवते.
लवंगाचे पाणी मेटाबोलिझम पावर वाढवण्यास आणि फॅट बर्न करण्यास फायदेशीर ठरते.
लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कफ आणि कंजेशन दूर करण्यास मदत करते.
लवंगाचे पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात ४-५ लवंग टाका. ते पाणी तेव्हापर्यंत उकळा जेव्हापर्यंत त्याचा रंग बदलत नाही. पाणी थंड होऊ द्या आणि नंतर ते प्या. त्यात तुम्ही चवीसाठी काळे मीठसुद्धा घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.