सकाळ डिजिटल टीम
आज आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झालीये.
आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
यावेळी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50) मु. पो. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला.
या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.
आज चंद्रभागेच्या तिरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला आहे.