मुख्यमंत्र्यांच्या हातात कुदळ अन् ट्रॅक्टरचं स्टेअरिंग; शिंदे रमले गावाकडच्या शेतीत, पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री शिंदे सातारा दौऱ्यावर

दरे (ता. महाबळेश्वर) येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी आले आहेत.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

मुख्यमंत्री रमले शेतीत

काल (बुधवार) ते दिवसभर आपल्या शेतीत रमले होते.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

फळझाडांची लागवड

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औषधी हळद, स्ट्रॉबेरी (Strawberry Farming), आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

'शेतीत रमताना वेगळाच आनंद मिळतो'

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना; पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव, शेती, गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

शेती-माती, गावाबद्दल प्रेम

माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

'जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात'

मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे व आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

पर्यटन विकासासाठी आराखडा तयार

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar

तब्बल 16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये झाली उत्तीर्ण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा