सकाळ डिजिटल टीम
टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमधून ते घराघरात पोहोचले.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला होता.
पत्नीचा होकार मिळवण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्ष वाट पाहावी लागली होती.
राजू यांच्या पत्नीचं नाव शिखा श्रीवास्तव असं आहे.
मोठ्या भावाच्या लग्नात पहिल्यांदाच दोघे एकमेकांना भेटले होते.
शिखा यांना पाहता क्षणीच राजू भैया त्यांच्या प्रेमात पडले होते.
शिखा यांच्याबद्दल माहिती मिळवल्यानंतर त्या त्यांच्या वहिनीची चुलत बहीण असल्याचं समजलं. त्यावेळी त्या उत्तर प्रदेशातील इटावा शहरात राहत होत्या.
काही ना काही कारणाने ते शिखा यांच्या घरी जाऊ लागले. चिट्ठीद्वारे ते शिखा यांच्याबरोबर संपर्कात राहिले.
परंतु, त्यांनी कधीही त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं नाही.
आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे असल्यास केवळ प्रेम नाही तर पैसेही महत्त्वाचे आहेत, हे उमगल्यावर राजू श्रीवास्तव यांनी १९८२ साली मुंबई गाठली.
त्यानंतर शिखा यांचं लग्न झालेलं नाही याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांद्वारे त्यांना लग्नाची मागणी घातली.
१७ मे १९९३ रोजी ते विवाहबंधनात अडकले. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.