Anuradha Vipat
सुप्रिया पाठारे यांनी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘साधी माणसं’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
सुप्रिया पाठारेंनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे
तसेच सुप्रिया पाठारेंनी फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे.
सुप्रिया पाठारेंनी लिहिलं आहे, लग्नानंतरचे सुरुवातीचे क्षण किती गोड असतात नाही! ते सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो, पुढे जाऊन पुन्हा पुन्हा बघण्यासाठी
पुढे सुप्रिया पाठारेंनी लिहिलं आहे, इतक्या वर्षांच्या सहवासात, संसाराच्या सहजीवनात, काळाच्या, जबाबदाऱ्यांच्या ओघात, प्रेमाचे अन् संसाराच्या सुरुवातीचे हे क्षण बघणं राहूनच जातं
एक फोटो सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करून टाकतो असं पुढे म्हटलं आहे