Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.
शिल्पाच्या विरोधात मुझफ्फूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी रविवारी मुझफ्फूरमधल्या शाम कल्याण ज्वेलरच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
हा कार्यक्रम कलम बाग चौकाजवळच आयोजित करण्यात आला होता.
शिल्पा शेट्टीला पाहाण्यासाठी रस्ताच्या दुतर्फा चाहत्यांची मोठी गर्दी झाली.
त्यामुळे सामान्य लोकांना आणि वाहतुकीला ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागलं. याविरोधात वकिल सुधीर कुमार ओझा यांनी कोर्टात तक्रार दाखल केली होती