Bigg Boss Ott Season 3 : 'हे' आहेत 'बिग बॉस ओटीटी सीजन ३' चे स्पर्धक

सकाळ डिजिटल टीम

शनिवार २२ जून २०२४ पासून कलर्स टीव्हीवर सुरु होणाऱ्या बिग बॉस ओटीटी सीजन ३ची चर्चा सगळीकडे असून अनिल कपूर या सीजनचं सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची यादी नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाने जाहीर केली.

चंद्रिका दीक्षित

वडापाव गर्ल म्हणून सोशल मीडियावर चर्चेत चंद्रिका दीक्षित तिच्या वादग्रस्त जीवनशैलीमुळेही चर्चेत असते. ती या शोमध्ये सहभागी होणार असून चॅनेलने सुद्धा तिचं नाव निश्चित केल्याचं जाहीर केलं.

साई केतन राव

मेहंदी है रचनेवाली, चाशनी, इमली यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता साई केतन राव बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हंटलं जातंय.

रणवीर शौरी

बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता रणवीर शौरी बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी होतोय. या घरात रणवीर त्याचा काय जलवा दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सना मकबूल खान

अभिनेत्री आणि मॉडेल सना मकबूल खान बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. सनाने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

पौलोमी दास

'द डस्की ब्युटी' म्हणून सोशल मीडियावर फेमस असलेली पौलोमी दासने आजवर अनेक मालिकांमध्ये, वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. पौलोमीचं नावंही बिग बॉस मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत आहे.

सना सुलतान

टिक टॉकमधून प्रसिद्धी मिळवत नंतर पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम करणारी 'सना सुलतान' ही बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

शिवानी कुमारी

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली शिवानी कुमारी ही कन्टेन्ट क्रिएटर शिवानी कुमारीही बिग बॉस ओटीटी सीजन ३मध्ये सहभागी होणार आहे.

विशाल पांडे

मॉडेल आणि सोशल मीडिया रील्समुळे अल्पावधीत प्रसिद्ध असलेल्या विशाल पांडे त्याच्या लीप सिंकमुळे प्रसिद्ध आहे. विशाल पांडेही बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

अरमान मलिक

दोन लग्नांमुळे सोशल मीडियावर फेमस असलेला व्लाॅगर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसह या शोमध्ये दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.