Anuradha Vipat
अगदी कमी वयात देखील लोकांना मधुमेह होत आहे
मधुमेहाच्या आजारात आवळा हा महत्त्वाचा ठरु शकतो. आवळा हा पोषक तत्वांनी युक्त असं फळ आहे.
आवळा बारीक करून त्याचा रस काढून त्यात थोडे काळे मीठ मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात तो समाविष्ट करू शकता.
आवळा वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे कारण निरोगी शरीराचे वजन रक्तातील साखरेचे प्रमाण चांगले राखण्यास मदत करते.
आवळामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील आहारातील फायबर दोन्ही जास्त असतात. ते साखरेचे शोषण रोखते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.