रक्तदाब कमी झाल्यावर 'या' गोष्टी खाव्यात; लवकर आराम मिळेल

सकाळ डिजिटल टीम

हल्ली बहुतेक लोक लो बीपीचे शिकार होत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अशी समस्या उद्भवत आहे.

पण ही समस्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.  अशा स्थितीत अनेक वेळा चक्कर येणे, मळमळ, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

कमी रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून अशी समस्या उद्भवणार नाही.

लिंबूपाणी

लो ब्लडप्रेशरच्या समस्येमध्ये जर आपण लिंबूपाणीमध्ये थोडे जास्त मीठ टाकून प्यायल्यास, खूप फायदेशीर ठरू शकते. मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, त्यामुळे बीपी सामान्य स्थितीत येतो.

ताक

कमी रक्तदाबाच्या रुग्णाने सकाळी किंवा नाश्त्यानंतर ताक घ्यावे. ताक प्यायल्यास, तुम्हाला तुमच्या लो बीपीवर नियंत्रण मिळविता येते. यासाठी तुम्ही साधे ताक पिऊ शकता.

पनीर

लो बीपीची समस्या असल्यास पनीर खाणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही पनीरमध्ये चाट मसाला किंवा मीठ घालून खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ताकदही मिळेल आणि लो बीपीच्या समस्येतही आराम मिळेल.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. डार्क चॉकलेटमध्ये असे गुणधर्म देखील आढळतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य करण्यास मदत करतात.

अंडी

अंड्यामध्ये प्रोटीन, फोलेट आणि लोह असते जे लो बीपीची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही लो बीपीमध्येही अंड्याचे सेवन करू शकता.