सकाळ डिजिटल टीम
तुळस ही आयुर्वेदातील एक उत्तम औषधी वनस्पती आहे जी रोगप्रतिकृशक्ती, शरीर शुद्धीकरण, आणि संपूर्ण आरोग्यासाठी वर्षानुवर्षे वापरली जात आहे. तसेच तुळशीचे रिकाम्या पोटी सेवन केले तर त्याचे अनेक लक्षणीय फायदे आहेत.
तुळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इसेन्शिअल ऑईल्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. रोज सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास बॅक्टरीया आणि व्हायरसेसशी लढायला ताकद मिळते.
तुळशीमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आहेत जे यकृत स्वच्छ करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी नियमितपणे तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने यकृताच्या कार्यास समर्थन मिळते आणि पचनास मदत होते.
तुळशीची पाने पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित करतात, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि अपचनाच्या समस्या दूर होतात. रोज सकाळी तुळशीची काही पाने खाणे पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते.
तुळस एक दाहक-विरोधी वनस्पती आहे. त्यामुळे रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने खोकला, दमा आणि सायनस सारखे आजार कमी होतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी तुळस एक उत्तम औषधी वनस्पती आहे. ती कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करते.
तुळस इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करत. त्यामुळे रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास नैसर्गिकरित्या मदत होते.
सकाळी तुळशीची ताजी पाने खाल्ल्याने कोर्टिसोलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते, तसेच दिवसभर शांत आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.