Anuradha Vipat
बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क पार पडला.
यावेळी निक्कीची टीम जिंकली.
असं असलं तरीही चुकीचं वर्तन करून तुम्ही विजयी झालात असा आरोप खेळ संपल्यावर दुसऱ्या टीमकडून करण्यात आला.
या सगळ्यात निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे.
घरात टास्क सुरू असताना निक्कीने B टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला.
त्यामुळे वर्षा यांनी,निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं असं म्हटलं.
यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणाली, यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत