धनश्री भावसार-बगाडे
आपले छंद, आवडनिवड बऱ्याच प्रमाणात आपला स्वभाव सांगत असतात.
काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याची आवड किंवा छंद असतो.
द माइंड जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार आज आपण अशा लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
जर तुम्हाला जेवण किंवा पदार्थ बनवायला आवडत असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहात.
अचानक येणाऱ्या समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्यात असल्याचं हे दर्शवतं.
उपलब्ध वेळ आणि साधनांचा अधिकाधिक उपयोग कसा करायचा आणि उत्तम परिणाम कसा मिळवायचा याची हतोटी तुमच्याकडे असते.
तुमच्यात चांगली निर्णय क्षमता आहे. गोष्टी घोळत बसण्यापेक्षा चटकन निर्णय घेऊ शकतात.
तुम्ही सर्जनशील आणि पॅशनेट आहात. कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.