सकाळ वृत्तसेवा
लग्नानंतर हनिमूनसाठी जाण्याचा विचार करत असाल तर आणि बजेट कमी असेल तरीही चिंता करायची गरज नाही.
आम्ही तुम्हाला भारतातील असे बेस्ट हनिमून डेस्टिनेशन सांगणार आहोत जे खूपच स्वस्त आहेत.
हे डेस्टिनेशन बजेट फ्रेंडली असून चांगल्या ठिकाणांपैकी आहेत. या स्वस्त हनिमून डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊयात.
गुलमर्ग - जम्मू-काश्मीरचं एक नितांत सुंदर हिल स्टेशन आहे. जे आपल्या सौंदर्यानं लोकांना आकर्षून घेतं.
लक्षद्वीप - लक्षद्वीप आपल्या एक लाख बेटांसाठी देखील फेमस आहे. इथले शांत बीच कपल्सना खूपच आवडतात.
गंगटोक - गंगटोक हे भारताचं असं रत्न आहे जे पाहण्यासाठी फक्त कपल्सचं नव्हे तर मित्रांचे ग्रुपही जातात.
केरळ - केरळमधील बीचवरील कुठलीही ठिकाणं आणि तिथला निसर्ग तुम्हाला नवचेतना देतो. हनिमूनसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
महाबळेश्वर - महाराष्ट्रातील हे थंड हवेचं ठिकाण हिवाळ्यात नितांत सुंदर आहे. इथं कायम पर्यटकांची रेलचेल असते, पण ते थोडं महागडं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.