मका खाणार 'शुगर' कंट्रोलमध्ये राहणार!

युगंधर ताजणे

मका आहे बहुगुणी...

मक्याविषयीच्या कित्येक गोष्टी लोकांना माहिती नाही. एव्हान आपल्या चित्रपट पाहताना अन् पावसात भिजताना पॉपकॉर्न खाणं एवढीच काय ती मक्याविषयी माहिती असते.

Corn Importance

पचनशक्ती चांगली राहते...

तुम्हाला माहिती आहे का, मका हा फायबरचा खूपच चांगला स्त्रोत असल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते.

Corn Importance

आहारात समावेश हवाच...

तुमचे पोट साफ होण्यासाठी देखील मका हा चांगला पर्याय आहे. पोटाशी संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या मक्याचा आहारात समावेश केल्यानं दूर होतील.

Corn Importance

कॉलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतो...

मका ही अँटिऑक्सिडेंटचा देखील चांगला स्त्रोत आहेत. जे हदयविकारासाठी लाभदायी असल्याचे दिसून आले आहे. मका हा कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो.

Corn Importance

औषधी तत्वं...

कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडेंटस असल्यानं तो तुमचे सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतो. ज्यामुळे कॅन्सरचा धोका बळावण्याची शक्यता अधिक असते. मक्यामध्ये कॅन्सरविरोधी काही औषधी तत्वं आहेत.

Corn Importance

लाभ आहे मोठा...

कॉर्नमध्ये ल्युटिन आणि जेक्ससेन्थिन यांचे प्रमाण असल्यानं या दोन्ही गोष्टी डोळ्यांसाठी खूपच महत्वाच्या आहेत. वृद्धांना देखील कॉर्न खूपच लाभदायी असल्याचे सांगण्यात येते.

Corn Importance

चांगला पर्याय...

शरीरातील साखर आटोक्यात आणण्यासाठी मका खूपच महत्वाचा आहे. असे आहारतज्ज्ञ सांगतात. डायबेटीसच्या रुग्णांसाठी मका हा एक चांगला पर्याय आहे असे म्हटले जाते.

Corn Importance

महत्वाची भूमिका...

मक्यामध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश आहे. ज्याचा उपयोग शरिरातील प्रतिकारक शक्तीचा महत्वाचा आहे. व्हिटॅंमिन सी ही शरीरात महत्वाची भूमिका बजावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corn Importance