Expensive Cars: ह्या आहेत जगातील सर्वात महागड्या कार्स...

Swapnil Kakad

'रोल्स रॉयस बोट टेल'

जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीत पहिले नाव येते ते म्हणजे  'रोल्स रॉयस बोट टेल' .या लग्झरिअस कारची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास २०० कोटी रुपये एवढी आहे.

Rolls-Royce Boat Tail

'बुगाटी ला वॉइचर नोइरे'

दुसऱ्या क्रमांकावर येते ती 'बुगाटी ला वॉइचर नोइरे'. कार्बन फायबरपासून बनलेल्या ह्या कारसाठी १३३ कोटी रुपये मोजावे लागतात.

Buggati La Voiture Noire

'बुगाटी सेंटोडीसी'

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोच्या कलेक्शनमध्ये असलेली 'बुगाटी सेंटोडीसी' हे तिसऱ्या क्रमांकावर असून याची किंमत जवळपास 75 कोटी रुपये इतकी आहे.

Buggati Centodieci

'मर्सिडीज मेबैक एक्सेलेरो'

जगात लग्झरिअस कारच्या चौथ्या नंबर वर येते ती 'मर्सिडीज मेबैक एक्सेलेरो'  ह्या मॉडेल जगात फक्त एकच कार बनवण्यात आली असून या कारची किंमत ५५.६५ कोटी इतकी आहे.

Mercedes Maybach Exelero

'बुगाटी दिवो'

१९२० मध्ये टार्गा फ्लोरिओ शर्यत जिंकलेल्या फ्रेंच रेसिंग ड्रायव्हर अल्बर्ट दिवो यांच्या नावाने ओळखली जाणारी 'बुगाटी दिवो'. ह्या कारची  किंमत तब्बल ६ दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.

Buggati Divo

'कोनिगसेग सीसीएक्सआर ट्रेविटा

 ही स्वीडिश ऑटोमेकर Koenigsegg ची आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत ३३.४ कोटी इतकी आहे.

Koenigsegg CCXR Trevita

लेम्बोर्गिनी वेनेनो

२०१३ मध्ये लाँच करण्यात आलेली लेम्बोर्गिनी वेनेनो ह्या कारची किंमत ३३.३ कोटी रुपये इतकी असून ह्या कंपनीने आतापर्यंत फक्त  १४ कार बनवल्या आहेत.

Lamborghini Veneno

'बुगाटी चिरोन सुपर स्पोर्ट 300+

 जगभरातील वेगवान कारच्या यादीतील 'बुगाटी चिरोन सुपर स्पोर्ट 300+' या कारची किंमत तब्बल ३२ कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buggati Chiron Super Sport 300+