Swapnil Kakad
ह्या परिस्थिमगचे नेमके कारण काय?
वातावरण बदलामुळे अतिवृष्टी हि अनेक देशांतील ऋतुमानाचा भाग बनली आहे आणि सततच्या अतिवृष्टीमुळे हे देश सध्या आपत्तीजनक पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, उष्ण वातावरण असलेल्या प्रदेशात वादळ निर्माण होत आहेत, जे वारंवार अतिवृष्टी होण्याचे महत्वाचे कारण आहे. भविष्यात हि साठीही आणखी बिघडण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.
तज्ज्ञांचे एक मत असेदेखील आहे कि केवळ वातावरण बदल हे वादळ निर्माण होण्याचे एकमेव कारण नाही. हि वादळनिर्मिती हि दिवसेंदिवस उष्ण आणि दमट होत चाललेल्या वातावरणामुळे होते आहे.
सध्या देशातील बहुतेक भाग मुख्यत्वे उत्तर भारत सध्या पूरपरिस्थितीचा सामना करत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या मते अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे ह्या भागात सध्या भीषण परिस्थिती आहे.
जपानच्या दक्षिण-पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे अनेक घरांत आणि दवाखान्यांमध्ये पाणी शिरले आहे. स्थानिक माहितीनुसार दक्षिण जपानमध्ये झालेल्या ह्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक अतिवृष्टीमुळे भूस्खल आणि पूरपरिस्थिती ओढावली आहे.
गेल्या आठवड्यात तुफान वादळांमुळे आलेल्या पावसामुळे स्पेनमधील झारागोझा हे शहर जलमय झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक पुराच्या पाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी गाड्यांच्या छताला अगदी घट्ट पकडून बसल्याचे दिसत आहे.
येथील स्थानिक माहितीनुसार पूरग्रस्त भागांमधून आत्तापर्यंत ४० हजारांहून जास्त लोकांना भाहेर काढण्यात यश आले आहे.
ह्या पुरामुळे अनेकांच्या घरांचे, ह्या भागांतील पायाभूत सुविधांचे नुकसान झाले तसेच अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला.
देशातील आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापनाने (AFAD) नुकतेच येथील १६ प्रांतांमध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे न्यू यॉर्क देखील जलमय आणि निसर्गाच्या ह्या आव्हानापुढे काहीसे हतबल झाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाल्यामुळे अनेक लोक काही काळ आपल्या गाड्या आणि घरांमध्ये अडकले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.