भारतात आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 नेमकं काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Monika Lonkar –Kumbhar

कोरोना

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीने अद्याप आपली पाठ सोडलेली नाही. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे, जगभरातील अनेक देशांची चिंता आता वाढली आहे.

Covid JN.1

कोरोनाचा नवा व्हेरिएंट

चीनमधून कोरोनाचा एक नवा सबव्हॅरिएंट जेएन.1 (JN.1) ची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. त्यानंतर, युके, आईसलॅंड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये आणि आता भारतात ही JN.1 ची प्रकरणे आढळून आली.

Covid JN.1

JN.1 काय आहे?

सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचा हा नवा सबव्हॅरिएंट ओमिक्रॉन सबव्हॅरिएंट BA.2.86 च्या कुळातील आहे. ज्याला ‘पिरोला’ असे ही म्हटले जाते.

Covid JN.1

JN.1 व्हेरिएंट

JN.1 आणि BA.2.86 या दोन्ही सबव्हॅरिएंट्समध्ये केवळ एकच फरक आहे आणि तो म्हणजे स्पाईक प्रोटिनमधील बदल होयं, असे मत अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या स्पाईक प्रोटिनला स्पाईन म्हणून ही ओळखले जाते.

Covid JN.1

ताप येणे

सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार या जेएन.१ ची कोणतेही खास लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे, याची लक्षणे ही कोवीड-१९ च्या अन्य व्हॅरिएंटसारखी सुरूवातीला तरी दिसून येत आहेत. त्यामध्ये ताप येणे हे लक्षण सांगितले जात आहे.

Covid JN.1

श्वास घेण्यास त्रास होणे

कोरोनाच्या जेएन.१ या लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे या लक्षणाचा ही समावेश आहे.

Covid JN.1

खोकला येणे

सतत खोकला येणे या लक्षणाचा ही यामध्ये समावेश आढळून येतो.

Covid JN.1

थकवा येणे

थकवा येणे किंवा अशक्तपणा जाणवणे या समस्यांचा समावेश देखील कोरोनाच्या JN.1 या व्हेरिएंटमध्ये आढळून येतो.

Covid JN.1

नवरीची १७ कोटींची साडी आणि ३० लाखांचा मेकअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rich marriage | esakal
येथे क्लिक करा.