Vishal Pahurkar
वातावरणातील बदलामुळे आणि हवेतील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्या सडतात आणि भाज्यांमध्ये जंतू निर्माण होऊ शकतात.
दह्यामध्ये आंबट गुणधर्म असतात आणि पावसाळ्यात सर्दी खोकल्याचे प्रमाणही वाढते त्यामुळे दही खाणं टाळावं.
या ऋतूमध्ये पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पावसाळ्यात मासे आणि सीफूड खाणे टाळा.
कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात त्यामुळे पोट खराब होऊ शकत म्हणूनच भाज्या ह्या चांगल्या शिजवूनच खाव्या.
पावसाळा म्हणले की बाहेरचा समोसा,पकोडा किंवा स्पाईसी फूड खाण्याचं क्रेझ जास्त असतो पण पावसाळ्यात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.
मशरूम हे नेहमी ओलसर भागात येत असतात पण या ऋतूत हानिकारक जिवाणूंची त्यामध्ये वाढ होऊ शकते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त प्रमाणात तिखट खाल्ले तर अपचन होऊन पोट खराब होण्याचा चांस असतो त्यामुळे अती तिखट खाऊ नये.
पावसाळ्यात वातावरणात गारवा वाढतो त्यामुळे फिजी ड्रिंक्सच सेवन करण्याऐवजी जलजीरा किंवा लिंबूपाणी यांसारखे हायड्रेटिंग पेय निवडावे.