राहुल शेळके
तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल. तो म्हणजे एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरु शकते?
क्रेडिट कार्ड ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कोणताही नियम नाही. तुमच्याकडे हवी तेवढी क्रेडिट कार्ड असू शकतात.
तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी, तुमची बँक तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहेत, तुमचा सिबिल स्कोर काय आहे, तुम्ही त्यांचा वापर कसा करता हे तपासते.
जर तुमचे उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला बरेच क्रेडिट कार्ड मिळू शकणार नाहीत. पण जर तुम्ही चांगले पैसे कमावले तर तुमच्याकडे क्रेडिट कार्डची कमतरता भासणार नाही आणि तुमच्याकडे हवी तेवढी क्रेडिट कार्ड असू शकतात.
अनेक लोक अनेकदा विविध बँकांचे क्रेडिट कार्ड ठेवतात. बहुतेक लोकांना असे वाटते की यामुळे त्यांची क्रेडिट मर्यादा खूप जास्त होईल.
अशा परिस्थितीत लोक हे विसरतात की यामुळे ना त्यांचे उत्पन्न वाढेल आणि ना त्यांची खर्च करण्याची शक्ती.
काही लोक एका कार्डवरून दुस-या कार्डवर पेमेंट करण्याच्या फिचर्समुळे अधिक कार्ड ठेवतात.
जास्त क्रेडिट कार्ड असणे हे आर्थिक समस्येचे कारण आहे. जर तुम्हाला तुमचा खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायचा नसेल तर 2-4 पेक्षा जास्त क्रेडिट कार्डे ठेवू नका.