सकाळ डिजिटल टीम
खेळाडूंच्या जर्सीवर तीन अंकी क्रमांक फार क्वचीतच पहायला मिळतो. परंतु तीन अंकी जर्सी परीधान करणारे हे खेळाडू कोण आहेत आपण जाणून घेऊयात.
भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या आपीएल २०१८ मधील जर्सी क्रमांक ७७७ होता.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन आपीएलमध्ये ८०० क्रमांकाची जर्सी परीधान करायचा. कारण तो कसोटी क्रिकेटमध्ये ८०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला खेळाडू होता.
आरसीबीचा गोलंदाज यश दयाल गुजरात टायटन्स मधून खेळताना १३३ क्रमांकाची जर्सी घालायचा. तर तो आता आरसीबी मधून १०४ क्रमांकाच्या जर्सीमध्ये पहायला मिळतो.
४०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा पहिला खेळाडू किरॉन पोलार्ड २०१८च्या आपीएल मध्ये ४०० क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी दिग्गज खेळाडू ड्वेन ब्राव्हो आपीएलमध्ये ४०० क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता. ज्यावेळी त्याने आपले ट्वेंटी-२० मधील ४०० विकेट्स पूर्ण केले.
वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल आपीएलमध्ये ३३३ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. जी त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या होती.
हार्दिक पांड्या
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना २२८ क्रमांकाची जर्सी परीधान करायचा. कारण १६ वर्षाखालील बडोदा संघाकडून खेळताना त्याने २२८ धावा केल्या होत्या.