निवृत्तीतून माघार घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असतानाही निर्णय मागे घेत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारे अनेक क्रिकेटपटू आपण पाहिले आहेत. त्यापैंकी या महत्वाच्या ११ खेळाडूंबद्दल माहीती घेऊयात.

retired cricketers | esakal

कार्ल हूपर

वेस्ट इंडिजचे अष्टपैलू खेळाडूने कार्ल हूपरने १९९९ वर्ल्ड कपच्या तीन आठवडे आधीच निवृत्ती घेतली होती. परंतु २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये कार्ल हूपरने संघाचे नेतृत्व केले होते.

retired cricketers | esakal

केविन पीटरसन

इंग्लंडचा माझी खेळाडू केविन पीटरसने २०११ मध्ये ट्वेंटी -२० आणि वन-डे फॉरम्याटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. परंतु त्यानंतर अनेकवेळा त्याची संघामध्ये निवड झाली होती.

retired cricketers | esakal

ब्रेंडन टेलर

झिम्बाब्वेचा स्टार क्रिकेटपटू ब्रेंडन टेलरने निवृत्तीनंतर पुनरागमन करत २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये भारतानिरूद्ध शतक झळकावले होते.

retired cricketers | esakal

जवागल श्रीनाथ

२००२ मध्ये कॅरिबियन दौरा संपल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज श्रीनाथने कसोटीतून अचानक निवृत्ती जाहीर केली. परंतु कर्णधार सौरव गांगुलीच्या सांगण्यावरून विंडीजविरुद्ध घरच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले. २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये देखील त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधत्व केले.

retired cricketers | esakal

शाहीद आफ्रिदी

माजी पाकिस्तानी कर्णधार शाहीद आफ्रिदीने अनेकदा निवृत्तीची घोषणा केली आणि आपल्या निर्णयावर वारंवार माघार देखील घेतली.

retired cricketers | esakal

इम्रान खान

पाकिस्तानचा माजी कर्णधार १९८७ च्या वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. परंतु लगेचच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. १९९२ च्या वर्ल्ड कपचा अंतीम सामना इम्रान खानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना होता.

retired cricketers | esakal

बेन स्टोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने जुलै २०२२ मध्ये वन-डे मधून निवृत्ती घेतली होती. परंतु २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्स पुन्हा खेळताना दिसला.

retired cricketers | esakal

भानुका राजपक्षा

जानेवारी २०२२ मध्ये रोजी श्रीलंकन फलंदाज राजपक्षाने "कौटुंबिक जबाबदाऱ्या" हे प्राथमिक कारण सांगून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. परंतु एका आठवड्यानंतर "येत्या वर्षांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे" सांगत आपला निर्णय मागे घेतला.

retired cricketers | esakal

मोईन अली

मोईन अलीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अलीची ही पहिलीच निवृत्ती नसून यापूर्वी २०२१ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधील आपला सहभाग थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

retired cricketers | esakal

इमाद वसीम

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली होती. परंतु २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये वसीम खेळताना पहायला मिळाला.

retired cricketers | esakal

मोहम्मद अमीर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु एका दिवसानंतर ट्वेंटी-२०मध्ये खेळणार असल्याचे त्याने सांगितले.

retired cricketers | esakal

IPL मध्ये तीन अंकी जर्सी क्रमांक परीधान करणारे खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jersey numbers | esakal
येथे क्लिक करा