Pranali Kodre
पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. आता त्याचा UEFA कडून खास सन्मान करण्यात आला आहे.
UEFA अध्यक्ष ऍलेक्झँडर कॅफरिन यांनी २९ ऑगस्ट रोजी चॅम्पियन्स लीगच्या लीग फेस ड्रॉ सेरेमनीदरम्यान रोनाल्डोचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
चॅम्पियन्स लीगमध्ये रोनाल्डोने केलेल्या शानदार कामगिरीनिमित्त त्याचा हा सन्मान करण्यात आला आहे.
रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये स्पोर्टिंग क्लब दे पोर्तुगाल, मँचेस्टर युनायटेड, रिअल मद्रिद आणि युव्हेंटस या संघांसाठी सामने खेळले आहेत.
रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये १८३ सामन्यांमध्ये सर्वाधिक १४० गोल केले आहेत. त्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लिओनल मेस्सीपेक्षा ११ गोल अधिक आहेत.
रोनाल्डोने मँचेस्टर युनायडेटकडून एकदा आणि रिअल माद्रिदकडून चारवेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. त्याने २००८, २०१४, २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षी विजेतेपद जिंकले.
त्याने २०१३-१४ च्या चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक १७ गोल केले होते.