Forbes: 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे जगातील टॉप-10 खेळाडू

Pranali Kodre

फोर्ब्सने नुकतेच 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. या यादीतील टॉप-10 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Cristiano Ronaldo | X/FIFAWorldCup

1. ख्रिस्तियानो रोनाल्डो

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटूची 2024 मधील कमाई 260 मिलियन डॉलर आहे. त्याची मैदानातून होणारी कमाई 200 मिलियन डॉलर आहे, तर मैदानाबाहेरची कमाई 60 मिलियन डॉलर आहे.

Cristiano Ronaldo | X/FIFAWorldCup

2. जॉन रहम

स्पेनचा गोल्फपटू जॉन रहम याची 2024 मधील कमाई 218 मिलियन डॉलर आहे. त्याच्या मैदानातील कमाई 198 मिलियन डॉलर, तर मैदानाबाहेरची 20 मिलियन डॉलर कमाई आहे.

Jon Rahm | X/PGATOUR

3. लिओनल मेस्सी

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची एकूण कमाई 135 मिलियन डॉलर आहे. त्याची मैदानावरील कमाई 65 मिलियन डॉलर, तर मैदानाबाहेरील 70 मिलियन डॉलर कमाई आहे.

Lionel Messi | X/FIFAWorldCup

4. लेब्रॉन जेम्स

बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सची 2024 मधील कमाई 128.2 मिलियन डॉलर असून त्याने मैदाना 48.2 मिलियन डॉलर, तर मैदनाबाहेर 80 मिलियन डॉलर कमाई केली आहे.

LeBron James | X/NBA

5. जॉन अँटेटोकोनम्पो

बास्केटबॉलपटू जॉन अँटेटोकोनम्पोची 2024 मधील कमाई 111 मिलियन डॉलर आहे. तो मैदानातून 46 मिलियन डॉलर आणि मैदानाबाहेर 65 मिलियन डॉलर कमाई केली.

Giannis Antetokounmpo | X/NBA

6. किलियन एमबाप्पे

फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेची 2024 मधील कमाई 110 मिलियन डॉलर आहे. त्याने मैदानातून 90 मिलियन डॉलर आणि मैदानाबाहेर 20 मिलियन डॉलर कमाई केली आहे.

Kylian Mbappé | X/FIFAWorldCup

7. नेमार

ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारची 2024 मधील मधील कमाई 108 मिलियन डॉलर आहे. त्याने मैदानातून 80 मिलियन डॉलर आणि मैदानाबाहेर 28 मिलियन डॉलर कमाई केली आहे.

Neymar | Sakal

8. करिम बेंझेमा

स्टार फुटबॉलपटू करिम बेंझेमाची 2024 मधील कमाई 106 मिलियन डॉलर आहे. त्याने मैदानातून 100 मिलियन डॉलर आणि मैदानाबाहेर 6 मिलियन डॉलर कमाई केली आहे.

Karim Benzema | X/FIFAWorldCup

9. स्टीफन करी

बास्केटबॉलपटू स्टीफन करीने 2024 मध्ये 106 मिलियन डॉलर कमाई केली असून त्याने मैदानातून 52 मिलियन डॉलर, तर मैदानाबाहेरून 50 मिलियन डॉलर कमावले आहेत

Stephen Curry | X/NBA

10. लेमर जॅक्सन

अमेरिकन फुटबॉलपटू लेमर जॅक्सनन 2024 मध्ये 100.5 मिलियन डॉलर कमाई केली असून त्याने मैदानातून 98.5 मिलियन डॉलर, तर मैदानाबाहेरून 2 मिलियन डॉलर कमावले आहेत.

Lamar Jackson | X/NFLonCBS

IPL मधील 12 वर्षांच्या कारकि‍र्दीत सॅमसनने पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

Sanju Samson | Rajasthan Royals | Sakal
येथे क्लिक करा