Sudesh
क्रंचीरोल अॅनिमे अवॉर्ड्समध्ये यावर्षीचा बेस्ट अॅनिमे पुरस्कार हा 'जुजुत्सु काईसेन' (सीझन 2) या अॅनिमेला मिळाला. यासोबतच तब्बल 11 कॅटेगरींमध्ये या सीरीजने पुरस्कार पटकावला आहे.
या शोला बेस्ट डिरेक्टर (शोता गोशोझोनो), बेस्ट अॅक्शन, बेस्ट कॅरेक्टर डिझाईन, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट एंडिंग अँड ओपनिंग सीक्वेन्सेस, बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टर (सातोरु गोजो) आणि तीन व्हॉइस अॅक्टर अवॉर्ड मिळाले.
यावर्षीचा बेस्ट अॅनिमे फिल्म हा पुरस्कार माकोतो शिनकाईच्या 'सुझुमे' मूव्हीला मिळाला.
होरिमिया दि मिसिंग पीसेस (Horimiya) या अॅनिमेला यंदाचा बेस्ट रोमान्स अवॉर्ड मिळाला.
डीमन स्लेयर, म्हणजेच Kimetsu No Yaiba या अॅनिमेच्या स्वॉर्डस्मिथ व्हिलेज आर्कला बेस्ट फॅन्टसी, बेस्ट आर्ट डिरेक्शन आणि बेस्ट अॅनिमेशन हे पुरस्कार मिळाले.
Attack on Titan च्या नव्या सीझनला यंदाचा बेस्ट ड्रामा आणि बेस्ट स्कोअर हे दोन पुरस्कार मिळाले.
Buddie Daddies या सीरीजला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल अॅनिमे हा पुरस्कार मिळाला.
Spy X Family या सीरीजला सर्वोत्कृष्ट कॉमेडी अॅनिमे अवॉर्ड मिळाला. यातील Anya Forger कॅरेक्टरला 'मस्ट प्रोटेक्ट अॅट ऑल कॉस्ट' कॅरेक्टर हा पुरस्कार मिळाला.
Chainsaw Man या अॅनिमे सीरीजला बेस्ट न्यू सीरीज हा अवॉर्ड मिळाला.
Oshi No Ko या अॅनिमे सीरीजच्या थीम साँगला बेस्ट अॅनिमे साँग हा पुरस्कार मिळाला.
या सोहळ्यामध्ये One Piece या अॅनिमेला बेस्ट कंटिन्यूइंग सीरीज हा पुरस्कार मिळाला.
या सोहळ्यात बेस्ट मेन कॅरेक्टर हा पुरस्कार 'वन पीस'च्या Monkey D. Luffy ला मिळाला.