पदार्पणात गोल्डन डक चांगला... ऋतुराजचा अर्शिन कुलकर्णीला अनोखा सल्ला

Pranali Kodre

लखनौ सुपर जायंट्सचा विजय

आयपीएल २०२४ स्पर्धेत ३० एप्रिल रोजी ४८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने पराभूत केले.

LSG | X/LucknowIPL

अर्शिन कुलकर्णीचे पदार्पण

याच सामन्यातून अर्शिन कुलकर्णीचे लखनौ संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण झाले.

Arshin Kulkarni | Instagram

सलामीला फलंदाजी

तो लखनौकडून दुसऱ्या डावात इम्पॅक्ट सब्स्टिट्युट म्हणून कर्णधार केएल राहुलसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला. मात्र, त्याला फार काही करता आलं नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

Arshin Kulkarni | X/LucknowIPL

गोल्डन डक

त्याला नुवान तुषाराने पायचीत पकडलं. त्यामुळे गोल्डन डकवर बाद होत त्यावा पहिल्याच षटकात माघारी परतावे लागले होते.

Arshin Kulkarni | X/LucknowIPL

ऋतुराजकडून अभिनंदन

असे असले तरी त्याला त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पदार्पणाबद्दल अभिनंदन करण्याबरोबर खराब सुरुवातीबद्दल धीरही दिला आहे.

Arshin Kulkarni | Instagram

ऋतुराजची पोस्ट

ऋतुराजने इंस्टाग्राम स्टोरीवर लखनौचा व्हिडिओ रिपोस्ट करत अर्शिनचे अभिनंदन केले. तसेच लिहिले की 'मोठ्या कारकिर्दीची ही फक्त सुरुवात आहे.'

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

ऋतुराजचा गमतीशीर सल्ला

इतकेच नाही, तर ऋतुराजने गमतीने असेही लिहिले की 'गोल्डन डकबद्दल जास्त काळजी करू नको, सुरुवात करण्यासाठी हा चांगला मार्ग आहे, विश्वास ठेव.'

Ruturaj Gaikwad Instagram Story | Instagram

ऋतुराजचा पहिला सामना

खरंतर ऋतुराज गायकवाड देखील त्याच्या चेन्नई सुपर किंग्ससाठी पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

'तो परत आलाय....' युझीची भारतीय संघात निवड होताच धनश्री काय म्हणाली?

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram
येथे क्लिक करा