Swadesh Ghanekar
२००८ पासून महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीसोबत आहे.
महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्सच्या ५ आयपीएल जेतेपदांचा स्टार आहे. तो म्हणजेच CSK असे समीकरण बनले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्याने CSK ला वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. पण, २०२५ च्या आयपीएलमध्ये खेळण्यावर संभ्रम आहे.
बीसीसीआय फ्रँचायझींना किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देते यावर MS Dhoni चा निर्णय ठरेल
धोनीसाठी CSK ने आयपीएलमधील जुना नियम आणण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ५ वर्षांहून अधिक काळ झाल्यास त्या खेळाडूला अनकॅप्ड म्हणून लिलावात घेता येईल.
CSK ने रिटेन न केल्यास धोनी अनकॅप्ड म्हणून येईल की मार्गदर्शक म्हणून काम करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महेंद्रसिंग धोनीने मागील पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवले होते.
महेंद्रसिंग धोनीने खेळण्यास नकार दिल्यास CSK लोकेश राहुल, ऋषभ पंत व इशान किशन यांचा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून विचार करू शकतात.
लोकेश राहुल, ऋषभ पंत हे आयपीएल २०२५ पूर्वी आपापल्या फ्रँचायझींना सोडतील अशी चर्चा आहे. इशान किशनला MI रिटेन करण्याची शक्यता कमी आहे.