Aishwarya Musale
आयुर्वेदात दह्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तसेच दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
तसे तर आपण दह्याला गरम करत नाही. पण काही पदार्थ दह्याच्या मिश्रणाने तयार होतात. जर तुम्ही दह्याच्या मिश्रणाने तयार पदार्थ गरम केले तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. डॉक्टरांनुसार, दही गरम केलं तर त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात.
लठ्ठपणा, कफ, रक्तस्राव किंवा सूज अशा समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. अशात दह्याचं सेवन केलं तर समस्या आणखी वाढू शकते.
डॉक्टरांनी सांगितलं की, रात्रीच्या वेळी दह्याचं सेवन कधीच करू नये. याने कफ होण्याची समस्या आणखी वाढते. तसेच दह्याचं सेवन रोज करू नये. रोज केवळ ताकाचं सेवन केलं जाऊ शकतं. ज्यात काळं मीठ, काळे मिरे आणि जिरं असेल.
दही फळांसोबत कधीच खाऊ नये. याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. फळांसोबत दह्याचं सेवन नियमित केलं तर पचनासंबंधी समस्या आणि अॅलर्जी वाढू शकते.
दही कधीच माश्यांसोबत खाऊ नये. चिकन, मटन किंवा मासे खात असाल आणि त्यासोबत दह्याचं सेवन करत असाल तर याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात.
डॉक्टर सांगतात की, बरेच लोक कशाचाही विचार न करता आणि जास्त प्रमाणात दही खातात. खासकरून रात्री दही खातात.
त्यामुळे जर तुम्हाला दही खायचं असेल तर दुपारी आणि कमी प्रमाणात खावं. जर दही खात नसाल तर ताक पिणे सगळ्यात चांगला पर्याय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.