सकाळ डिजिटल टीम
दही खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यांना दूध प्यायला आवडत नाही, ते दही खाऊ शकतात.
दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी-2, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.
रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. दही हा एक प्रोबायोटिक अन्न पदार्थ आहे, जो तुमची पचनसंस्था निरोगी ठेवतो.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स (Probiotics) शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते. सकाळ-संध्याकाळ दही खाल्ल्याने फायदा होतो. मात्र, संध्याकाळी दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.
सकाळी दही आणि साखर किंवा फक्त दही खाणे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
महिलांमध्ये योनीमार्गाचे संक्रमण रोखण्यासाठीही दही उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया योनीचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis Symptoms) सारख्या हाडांच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.