सकाळ डिजिटल टीम
कढीपत्ता ही सामान्यतः फोडणीत वापरली जाणारी पाने आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, ही छोटी हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर नियंत्रित करणाऱ्या औषधापेक्षा कमी नाहीत.
कढीपत्त्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात आणि जर तुम्ही कढीपत्त्याचे योग्य सेवन केले, तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करू शकते.
तज्ञांच्या मते, जर कढीपत्ता दररोज खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्यातील रोग नियंत्रित करणे खूप सोपे होऊ शकते.
ताजा कढीपत्ता तुमच्या डिशची चव वाढवेल. हे तुमच्या उच्च साखरेच्या पातळीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करेल.
तुम्ही तुमच्या डाळ, भाजी, चटणी आणि उपमा सारख्या नाश्त्याच्या फोडणीत काही कढीपत्ता घालू शकता.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही कढीपत्ता हर्बल चहा देखील पिऊ शकता.
हा चहा बनवण्यासाठी - एक ग्लास पाणी उकळत ठेवा.
या पाण्यात 10-12 ताजी कढीपत्त्याची पाने घाला.
आता सर्वकाही मध्यम आचेवर 10 मिनिटे शिजवा.
नंतर गाळून गरमागरम कढीपत्त्याचा हर्बल चहा प्या.