राहुल शेळके
सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या बँक खात्यातून 11 लाख रुपये काढण्यात आले आहेत.
पीडितेला व्हॉट्सॲपवरून एक मेसेज आला आणि तीने एक क्लिक केल्यामुळे तीला 50 रुपये मिळाले.
पीडितेला सांगितले की Google Maps वर रेटिंग द्या. त्यासाठी प्रत्येक क्लिकमागे 50 रुपये पेमेंट मिळेल.
प्रथम पीडितेला 300 रुपये मिळाले. यानंतर सायबर गुन्हेगारांनी पीडितेचा विश्वास जिंकला. सायबर गुन्हेगारांनी पीडितेला प्रीपेड प्लॅनबद्दल सांगितले. यानंतर पीडितेला 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले.
सायबर गुन्हेगारांनी वचन दिले की प्रीपेड केले तर चांगले पैसे मिळतील. खासगी कंपनीत काम करणारी पीडित तरुणी याला बळी पडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडितेला अतिशय हुशारीने लुटण्यात आले. पीडितेच्या बँक खात्यातून 20 व्यवहार करण्यात आले, ज्यामध्ये 11.39 लाख रुपये काढण्यात आले.
पीडितेने परतावा मागितल्यावर सायबर फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आणि सायबर गुन्हेगारांनी तीला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.